History
Legacy of PNG
To say precious metals and jewellery flows in our blood would not exactly be out-of-place!
We are visibly India’s oldest and most respected jewellers and are proud of our lineage, a lineage spread across 200 years of rich and varied history replete with tales of steadfast workmanship,customer-centric vision and a rock-solid reputation of honesty to one’s cause and trade.
It all started in the intervening years between 1810 and 1820 when at the call given by Sardar Parshuram Bhau Patwardhan and Shri Balasaheb Patwardhan, Shri Narayanrao Vasudev Gadgil, the latter a businessman of small means in the village of Trimbak in the Malvan Taluka of Konkan made his way to Sangli to create a new enterprise for himself. It was his son Shri Ganesh Pant who picked up the intricacies of the trade under the tutelage of Shri Modak of Trimbak who too made Sangli his home. In the November of 1832, flush with experience Shri Ganesh Pant set out to test his destiny with his own enterprise named “Ganesh Narayan Gadgil”.
To this day, the Gadgil Family treasures an original sheet of his accounts as a family heirloom!
In the initial days in the absence of a dedicated safety-locker Shri Ganesh Pant would carry his stock of jewels and precious metals to his shop and bring the unsold stock back home- every day!
In time, Shri Ganesh Pant was blessed with three sons, Shri Ramchandra, Shri Narayan and Shri Gopal all of whom ably assisted him in his business. Bal Nana taking the assistance of Bhulukaka Abhyankar continued the family enterprise. With hard work, dedication and excellent customer rapport, Bal Nana built up a reputation for himself and his enterprise. The floods of 1914 saw people leaving Sangli in droves for safer grounds. While departing, they kept their valuables with Bal Nana in his shop. On their return, they were surprised to find their belongings intact! Such was the level of dedication to his trade!
Bal Nana had three sons and two daughters. The three sons Shri Purushottam, Shri Ganesh Pant and Shri Vasudev went on to earn a name for themselves and their enterprise within a span of 4 decades between 1880 and 1920. Each had his own strong points which they put together to collectively bring up the enterprise! And it during this time that the family procured their very first safe deposit box, straight from Godrej of Mumbai! Around this time, it was rumored that they had a single-day sale of INR 20,000.00 during the Padva of Chaitra when gold retailed at INR 20.00 per gram which meant a sale of 1000 grams of gold in a single day!
With name came fame! The family came to be identified with every positive trait in the world of business and enterprise, be it honesty, customer satisfaction, dedication and most of all, taking care of customers in the latter’s trying times! The Sangli Bank which was established in the year 1916 not surprisingly had Aaba i.e. Shri Purushottam Gadgil as one of the founding members! Similar was the case with the Sangli Saraf Association which too came about due to the positive leadership of Aaba!
The 1920s saw the emergence of the Gadgil Family’s 4th Generation who came to the assistance of Bapu Kaka. All the seven cousins, experts in their own areas, came to work jointly under Bapu Kaka.
Today, 2022 sees the enterprise PNG as a name to go to when looking for traditional jewels, service beyond the normal call of duty and most of all, assured quality of material and workmanship!
With branches in Kolhapur, Vishrambag/ Sangli, Chiplun, Ratnagiri , Karad, Belagavi, Ichalkaranji, Jamkhandi, Vijayapur and Miraj, the name PNG is bound to grow in years to come!
Our lineage as is obvious, shall always be written in GOLDEN LETTERS!
सन १७६१ साली, पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला उतरती कळा लागली व १८१० ते १८२० च्या दरम्यान पेशवाई संपुष्टात आली. पेशवाईच्या दरम्यान, पेशव्यांचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन व मिरजेचे संस्थानिक बाळासाहेब पटवर्धन यांनी सांगली ग्रामी नवीन संस्थान बसविण्याचा निर्णय घेतला. ही वार्ता कर्णोपकर्णी कोकण येथील मालवण तालुक्यातील त्रिंबक या गावी छोटा मोठा व्यापार करणारे, श्री. नारायणराव वासुदेव गाडगीळ यांच्या कानावर गेली, श्रीयुत नारायणराव आपले नशिब आजमावण्यासाठी १८१५ ते १८२० च्या दरम्यान सांगली येथे आले. गाडगीळ घराण्याचे मुळ कुलदैवत गुहाघर तालुक्यातील वेळणेश्वर.
श्रीयुत नारायणराव सांगली येथे आल्यावर त्यांचे निवासस्थान हरभट रोडवरील कोल्हटकर वाड्यात होते. सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत सरकार धुंडिराज चिंतामणराव पटवर्धन हे गाडगीळ घराण्याचे श्रेष्ठ आश्रयदाते होते. नारायणराव सुरुवातीला राजापुरी पंचाचा किरकोळ व्यापार करत असत. नारायणरावांचे चिरंजीव श्री. गणेशपंत हे त्रिंबकहुन आलेल्या व सांगली येथे स्थायिक झालेल्या, श्री. मोडक यांचेकडे ४ ते ६ महिने राहून त्यांच्याकडून सावकारीची व सराफीची माहिती घेतली. त्यांनी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, नंदननाम संवत्सरे, शके १७५४, गुरुवार दिनांक २९ नोव्हेंबर १८३२ साली सराफी व्यवसायाचा पाया घातला. त्यावेळी गणेश नारायण गाडगीळ नावाने सुरु केलेल्या दुकानच्या जमा खर्चाची वही आजही गाडगीळ घराण्याकडे आहे.
सुरुवातीचे याचे स्वरूप म्हणजे पडशीत सोने रुपेचे जिन्नस भरून सराफकट्ट्यात आणून मांडायचे व सायंकाळी पुन्हा पडशी भरून घरी न्यायची पद्धत होती. दुकानातील पहिली तिजोरी येईपर्यंत सराफी व्यवसायाचा याप्रमाणेच दिनक्रम असे.
श्री. गणेशपंतांचे ३ चिरंजीव रामचंद्र, नारायण आणि गोपाळ. यातील मधले नारायणराव तथा बाळनाना हे सराफी घराण्याची दुसरी पिढी गाजविणारे कर्तृत्ववान पुरुष. त्यांनी सराफी व्यवसायाचे पुर्णशिक्षण, आपले वडिलबंधु रामचंद्रपंत यांचे हाताखाली घेतले. रामचंद्रपंत व गोपाळराव यांनी पुढे अनुक्रमे तुपाचा व कापडाचा व्यवसाय सुरु केला. बाळनानांनी श्री. भुलूकाका अभ्यंकर यांच्या सहाय्याने आपला सराफी व्यवसाय वाढविला. बाळनानांना भुलूकाका अभ्यंकर व दुसरा सेवक शिदू हे इमानी सेवक मिळाले. शिदू हा मारुतीसारखा धिप्पाड व अतिशूर होता. सोने आणण्यासाठी तो सांगलीहून मुंबईस कमरेला सुरती रुपये बांधून चालत अनेक खेपा करत असे.
मे. पु. ना. गाडगीळ यांनी अल्पावधीतच व्यवसायामध्ये विश्वास संपादन केला. १९१४ साली आलेल्या कृष्णेच्या महापुरात अनेकांना सांगली सोडून लांब रहावयास जावे लागले होते. यावेळी लोकांनी आपल्याकडील सोने नाणे गाडगीळांकडे आणून दिले. तेंव्हा बाळनानांनी त्यांना, आपापल्या पिशवीला, आपापल्या नावाची चिठ्ठी लावून ठेवण्यास सांगितले. पुढे पुर ओसरल्यावर लोकांनी आपापले जिन्नस परत नेले व कुणाचा एक तुकडाही गमावला नाही.
बाळनानांना ३ सुपुत्र व २ कन्या होत्या. जेष्ठ पुत्र पुरुषोत्तम तथा आबा, मधले गणेशपंत तथा दादा व सर्वात लहान वासुदेव तथा बापुकाका. १८८० ते १९२० या कालावधीत तिसऱ्या पिढीतील या तिघा बंधुंनी सराफी व्यवसाय नावलौकिकास आणला.
श्री. पुरुषोत्तम तथा आबा सांगलीच्या पेढीचे थोर शिल्पकार. हे उपजतच रत्नपारखी होते. तसेच गिऱ्हाईकाचीही त्यांना चांगलीच पारख होती. त्यांचे कर्तृत्व थोर व दानतही मोठी होती. यांच्याच कारकिर्दीत १९१० साली, सराफी दुकानात पहिली तिजोरी आली. सदर तिजोरी मुंबईतील भायखळामधील गोदरेज यांच्या कारखान्यातील होती. त्यांचे कनिष्ठ बंधु गणेशपंत तथा दादा यांना सराफी व्यवसायाबरोबर शेतीचीही आवड होती. त्यांना सामाजिक कार्यातही विशेष रस होता. धाकटे बंधु वासुदेव तथा बापुकाका हे मुंबईबरोबर इतर पेठांचाही व्यवहार पहात असत. व्यापारी देवी घेवी मध्ये ते अत्यंत निष्णात होते. या तिघा बंधुंनी, सांगलीबरोबरच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जावून प्रदर्शनात सहभाग घेतला. १९१५ ते १९२० च्या दरम्यान विदर्भातील अमरावती येथे दागिन्यांचे मोठे प्रदर्शन भरले होते. त्यामध्येही गाडगीळांनी ठेवलेल्या दागिन्यांना विशेष मागणी होती. या प्रदर्शनात दागिन्यांची भरपूर विक्री झालीच शिवाय नावही गाजले. त्या काळात, एका चैत्री पाडव्यास, दुकानात रु.२०००० चा धंदा झाल्याची नोंद आठवते. त्यावेळी सोन्याचे मुल्य प्रति तोळा रु.२० एवढे असेल.
सुरुवातीस सराफी व्यवसायाबरोबर सावकारीचा व्यवसायही दुकानात चालत असे. गाडगीळांचा हा व्यवहार अत्यंत सचोटीचा व प्रामाणिकपणाचा होता. तशी दुकानची ख्यातीच होती. आजोबांनी खरेदी केलेला जिन्नस दुर्दैवाने नातवास विकायची जरी वेळ आली तरी जुन्या पावतीवर विश्वासपुर्ण व्यवहाराची पुर्तता केली जाई. म्हणूनच त्यांना स्वतःच्या मालाची जाहिरात कधी करावी लागली नाही. ती गिऱ्हाईकाकरवी परस्परच होत असे.
१९१६ साली दि. सांगली बँकेची स्थापना झाली. या बँकेच्या संचालक मंडळात आबांचेही नाव होते. तसेच १७ ऑगस्ट १९२३ साली, सांगली सराफ असोसिएशनची स्थापनाही आबांच्या नेतृत्वाखाली झाली.
१९२० च्या सुमारास गाडगीळ घराण्याची ४थी पिढी बापुकाकांच्या मदतीस आली. श्री. गणेशपंत यांना ३ चिरंजीव. सर्वात जेष्ठ शंकरराव तथा आप्पासाहेब, मधले श्री. अनंत तथा दाजीसाहेब, सर्वात लहान सदाशिव तथा सदुभाऊ. वासुदेवरावांना ४ सुपुत्र. सर्वात जेष्ठ रामचंद्र तथा भाऊराव, दुसरे श्री. लक्ष्मण तथा नाना, तिसरे श्री. विश्वनाथ तथा विसुभाऊ व सर्वात लहान श्री. हरिभाऊ. अशी एकूण ७ भावंडे बापूकाकांच्या हाताखाली आली. या दरम्यान श्री. गणेशपंत तथा दादा हे सराफी दुकानाबरोबरच सलगर येथील शेतीचा व्यवसायही सांभाळत असत.
सन १९३२ च्या सुमारास मे. पु. ना. गाडगीळ, सांगली या पेढीने शताब्दी साजरी केली. श्री. रामचंद्र तथा भाऊराव व लक्ष्मण तथा नाना हे दोघेही उत्तमपैकी रत्नपारखी होते. मुंबईसह सर्व महाराष्ट्रात त्यांची ख्याती पसरली होती. शंकरराव तथा आप्पासाहेब हे सोन्या चांदीचा कस पारखण्यात निष्णात होते. तसेच लिलावातील बोलीतही ते निपुण होते. श्री. अनंत तथा दाजीकाका यांचे गिऱ्हाईकाशी सौजन्यपुर्ण वागणे व मनमिळावू स्वभाव असा त्यांचा लौकिक होता. विश्वनाथ तथा विसुभाऊ हे सराफी व्यवसायाबरोबर अडत दुकान, तेलगिरणी या व्यवसायात वाकबगार होते. चवथे हरिभाऊ हे सोने चांदीचा कस पारखणे, हिऱ्या मोत्यांच्या व्यवसायाबरोबरच दुकानातील सोने चांदी कामगारांचे हिशोब पाहणे यात वाकबगार होते.
१९५५ पासून गाडगीळांची ५ वी पिढी या व्यवसायात उतरली. शंकरराव तथा आप्पासाहेब यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. यशवंत तथा बाबुराव हे दुकानातील व्यवहार पाहू लागले. सोने चांदीचा कस पाहण्यात ते अतिशय पारंगत होते. तसेच त्यांचे वागणेही गिऱ्हाईकाशी स्नेहपुर्ण होते. त्यांचा जनसंपर्क व समाजकार्य हा आवडीचा विषय होता. सांगलीतील अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत होते.
१९५७ साली आमच्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सांगली दुकानने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला.
१९५८ च्या सुमारास वासुदेव तथा बापुराव यांच्या प्रेरणेतून, लक्ष्मणराव तथा नानासाहेब, अनंतराव तथा दाजीकाका, विश्वनाथ तथा विसुभाऊ या तिघांनी पुणे येथे मे. पु. ना. गाडगीळ अँड कंपनी या नवीन नावाने दुकानची मुहुर्तमेढ लक्ष्मीरोडवर रोवली. सांगलीचे संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन व राणीसाहेब सौ. सरस्वतीदेवी यांच्या हस्ते दुकानचे उद्घाटन झाले.
१९६५ च्या सुमारास शंकररावांचे व्दितीय सुपुत्र श्री. प्रभाकर तथा अरुणराव व १९७० च्या सुमारास शंकररावांचे कनिष्ठ चिरंजीव श्री. प्रकाशराव हे व्यवसायात कार्यरत झाले. तसेच श्री. हरिभाऊ यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. धनंजय तथा सुधीर १९७० पासून दुकानचे व्यवहार पाहू लागले. १९७८ पासून हरिभाऊ यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री. गणेशकाका सराफी दुकानात कार्यरत झाले. १९८० ते १९९५ या काळात गाडगीळ घराण्याच्या ६ व्या पिढीचे व्यवसायात पदार्पण झाले. श्री. यशवंत तथा बाबुराव यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. पुरुषोत्तम तथा मिलिंद, तसेच श्री. प्रभाकर यांचे दोनही चिरंजीव श्री. राजीव व श्री. समीर व श्री. धनंजय तथा सुधीर यांचे चिरंजीव श्री. वासुदेव तथा सिद्धार्थ सध्या या व्यवसायात कार्यरत आहेत.
सांगलीच्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ या पेढीने आपली पहिली शाखा १२ डिसेंबर २०१० रोजी कोल्हापूर येथे सुरु केली. या कार्यक्रम सोहळयाचे उद्घाटन कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे हस्ते झाले. त्यांनतर अनुक्रमे विश्रामबाग, चिपळूण, रत्नागिरी, कराड, बेळगाव, इचलकरंजी, विजयपूर व जमखंडी येथे आमच्या शाखा कार्यरत आहेत व त्यांस ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे.